महत्वाची सूचना : शासकीय योजना संदर्भातील माहिती खाली पाहा.
अध्यक्ष: श्री. एन. के. सिंग
नेमणूक: २७ नोव्हेंबर २०१७
शिफारस कालावधी: २०२० ते २०२५
सदस्य: शक्तीकांत दास, डॉ. अनुप सिंग, अशोक लाहिरी, रमेश चांद
सचिव: अरविंद मेहता
योजनेचे स्वरूप
कालावधी: १ एप्रिल २०२० – ३१ मार्च २०२५
उद्देश: ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण
निधीचे प्रकार: मुलभूत (अनटाईड) व बंधनकारक (टाईड)
वाटप: ५०% – ५०%
गणना: २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या व क्षेत्रफळ
बंधनकारक निधी अंतर्गत कामे
स्वच्छता व हगणदारीमुक्त दर्जा राखण्यासाठी सार्वजनिक शौचालय बांधकाम/दुरुस्ती, बंदिस्त नाली बांधकाम, कंपोस्ट / गांडूळ खत तयार करणे, गोबर गॅस योजना, शाळा/अंगणवाडीत शौचालय, कचरा संकलनासाठी घंटागाडी
पाणीपुरवठा योजना: नळ पाणीपुरवठा विस्तार व दुरुस्ती, मोटार/पाईप/विहिरींची दुरुस्ती, आर.ओ. प्लांट बसवणे, टाक्या बांधकाम, विंधन विहिरी, जनावरांसाठी हौद
पावसाचे पाणी संकलन व पुनर्भरण: रुफ वॉटर हार्वेस्टिंग, माती बांध, शेततळे, गावतळे, सार्वजनिक विहिरींचे पुनर्भरण
अबंधनकारक निधी अंतर्गत कामे
पेयजल व साठवणूक साधने
लसीकरण व कुपोषण निर्मूलन
रस्ते दुरुस्ती व बांधकाम
सौर/एलईडी दिवे
स्मशानभूमी व देखभाल
Wi-Fi सुविधा
सार्वजनिक वाचनालय, उद्यान, खेळाचे मैदान
आपत्ती व्यवस्थापन
खर्च करता न येणाऱ्या बाबी
एकाच योजनेवर दुबार खर्च
मानधन, पगार, T.A./D.A.
समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सजावट
Connect
Stay updated with village news and events.
Contact
info@dongargaon.com
+91-12345-67890
© 2025. All rights reserved.
